मला काल खरेच स्वर्गीय आनंद मिळाला. एकदा तुम्ही सर्वांनी मुद्दाम वेळ काढून, कीर्तनाला जाऊन तर बघा...
सध्या कीर्तन, प्रवचन ऐकायला मिळणं दुर्मीळ होत चाललं आहे. हे कलावंत सन्मानानं जगले पाहिजेत. एक जण म्हणाले, कीर्तनकार हल्ली भरपूर बिदागी घेतात म्हणे! काय चूक आहे, त्यांनाही घरदार आहे. आपण सहकुटूंब सिनेमा पाहायला मल्टिप्लेक्समध्ये गेलो, तर चार जणांच्या कुटुंबावर सहज दोन-तीन हजार खर्च होतात. पण संस्कार करण्याचं काम करणाऱ्या प्रवचनकार, किर्तनकार यांना बिदागी देताना हात आखडता का घ्यायचा?.......